गिरवी गोपालकृष्णाबद्दल काय अनन्य आहे


  • १. दोन मूर्तिकारांच्या रूपात श्रीकृष्णाने स्वतः कोरलेली एकमेव मूर्ती. एका रात्रीत तयार केलेली अद्भुत मूर्ती. विशेष म्हणजे एका मूर्तिकारास हात नाहीत तर दुसयास डोळे नाहीत विश्वातील एक चमत्कार
  • २. हरि (विष्णू) शिव (हर) परिपूर्ण आणि पूर्ण ऐक्य. भगवान श्रीकृष्ण भगवान शिवाच्या साळुंकावर विराजमान आहेत . म्हणूनच हे एक अद्वितीय स्थान आहे जिथे भगवान श्रीकृष्णाच्या समोरच्या बाजूस भगवान शिव आणि नंदी हे पण उपस्थित आहेत, हनुमंत आणि गरुड यांचे सहित .
  • ३. भगवान श्रीकृष्णाने स्वत: ही मूर्ती कोरल्यामुळे मूर्ती तयार करण्यात परिपूर्णता आणि अचूकता आहे. विलक्षण भाव प्रसन्नानाही आहे. तसेच हातावरील रेषा आणि सर्व दागिने (अलंकार), पीतांबर (वस्त्र) मूर्तीमध्येच कोरलेली आहेत . श्रीमत भागवतात केलेल्या वर्णनानुसार तंतोतंत घडवलेली ही मूर्ती श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन देत आहे
  • ४. अशी एक श्रद्धा आहे कि हि जागा एक तपोभूमि असून श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेकडे गेले , तेव्हा विरहाने त्याची आई यशोदा खूप दुःखी झाली होती. भारतभर भ्रमण केले पण गिरवी या जागी येऊन ती शांत झाली, माता यशोदाला भेटायला गोपालकृष्ण या ठिकाणी येत असत आणि यशोदाने प्रसंगी काही प्रसंगी त्याला भोजन भरवले होते. हे गोपालकृष्णाचे रूप असल्यामुळे येथील वास्तव्यास असणाऱ्या श्री. बाबूराव या महान कृष्णभक्तसिही या रूपातच दर्शन देते असत व त्याच रूपात ते मंदिरात प्रकट झाले आहेत.
  • ५. बाबुराव महाराज यांच्या असीम भक्तीमुळे तसेच इतिहासामुळे या स्थानी कृष्णाने कायमचे राहण्याचे व येथे स्वतःगहाण राहण्याचे ठरविले. गिरवी यांचा अर्थ गहाण आहे व त्यावरून या गावाचे नाव ‘गिरवी’ असे झाले .

म्हणून गिरवी गोपाळकृष्ण हे एक अद्वितीय स्थान आहे आणि दक्षिण भारतातील वृंदावन आणि अध्यात्मिक उजैचे केंद्र म्हणून गौरविले गेले आहे