आमच्याबद्दल


श्रीगोपालकृष्ण मंदिर , गिरवी ( फलटण )

भगवान श्रीकृष्णाचे अतिशय प्रिय व घनिष्ठ संबंध असलेले व त्यामुळे अत्यंत जागृत व पवित्र स्थानाचा परिचय करून घेऊ. हे मंदिर फलटणपासून १२ कि.  मी.  अंतरावर गिरवी नावाचे एका लहान गावात आहे.

भगवान गोपाळकृष्णाचे मंदिर गावाच्या   दक्षिणेकडील टोकाला आहे. हे मंदिर श्री. देशपांडे यांचा मालकीचे असून मंदिर व्यवस्थापन श्री. देशपांडे कुटुंबाकडे आहे. देवळाचे बाह्यस्वरूप दर्शवते की ते विजापूरच्या आदिलशहाच्या कारकिर्दीत श्री. बाबूराव गोपाळ देशपांडे उर्फ बाबूरावमहाराज यांनी मूळ मंदिर बांधले व नंतरच्या  काळात सभामंडप जोडण्यात आला. 

भगवान श्रीगोपाळकृष्णाच्या जागृत स्थानाचा दिव्या इतिहास

श्री. बाबुरावमहाराज आजूबाजूच्या खेड्यात शासकीय दौर्‍यावर असतांना विजापुरचे आदिलशहा यांच्यासमवेत तैनात असलेले श्री. राव रंभाजी यांच्या समवेत असत. श्री.बाबुरावमहाराज हे भगवान गोपाळकृष्णांचे एकनिष्ठ आणि निष्ठावान भक्त होते. त्याच्याबरोबर  मुरलीधराची चांदीची मूर्ती होती व त्याची  ते श्रद्धेने ने नित्य पूजा करीत. आपल्या गावी गिरवी येथे भगवान गोपाळकृष्णाची शळिग्राम    रूपातील अशीच मूर्ती  घडवून  मंदिर स्थापन करण्याची प्रेरणा झाली . तथापि, वर्षानुवर्षे एकत्र शोध घेऊनही  इच्छित  शिळा (शळिग्राम ) उपलब्ध  झाली नसल्यामुळे ते अस्वस्य झाले .  त्यांनी कळकळीने श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भजनाच्या तिसर्‍या दिवशी एक ध्वनी आला. त्यानंतर काही दिवस असेच घडत राहिले व ध्यानात श्री.बाबुराव यांना एक स्थान दाखवले गेले व खोदाई करणयाची सूचना दिली गेली . श्री.बाबुराव  यांनी त्या जागेवर मजूर लावून खोदण्याचे काम सुरू केले परंतु  आदिलशहा कडे  थेट काही  व्यक्तिकडून  खोदाईविरुद्ध  तक्रारी करण्यात आली . एका अधिका्याने तातडीने घटनास्थळाला भेट दिली व ते  उत्खनन थांबवले. त्यानंतर बाबुराव विजापूर येथे दाखल झाले आणि राजाला केवळ मूर्तीसाठीच केवळ   दगड  (शळिग्राम )  मिळावा म्हणून बादशाहीचा शाही परवानगी देण्याची विनंती केली. उत्खनन करण्याचा त्यांचा हेतू कोणतीही संपत्ती शोधाशोध नव्हताच. राजाने उत्खनन करण्यास त्वरित संमती दिल्यावर अधिकारी, तसेच उत्खननासाठी स्थगिती हुकूम देणार्‍याने मुदत दिली.  बाबुराव यांना आवश्यक ती मदत पण दिली . खोदाई  सुमारे ४० मीटर झाल्यानंतर एक मोठी शिळा प्राप्त  झाली , बादशहाला सांगुन अर्ज सादर केला  व ही शिळा त्याचे गावात (गिरवी ) नेण्यासाठी परवानगी मागितली व त्यानुसार परवानगी मिळाली. शिळेवर काही मूर्ती / कोरीव काम आहे का हे शोधण्यासाठी बाबुराव यांनी दगडाची तपासणी केली. फक्त  विषणु चिन्हांकीज रेषा आटळळ्या मुहूर्त बघून  शिका गिरवीला नेण्यात आली . पहिला टप्पा पूर्ण झाला. पुढचा आणि सार्वात मह्रत्वाचा म्हणजे  योग्य मूर्तिकारांचा शोध घेणे हा होता. शर्थीचा प्रयत्न करूनही मूर्तिकार मिळेनात. श्री.बाबुराव यांच्या मानसपूजेसारखीच मूर्ती हवी आणि ही मूर्ती घडवताना कोडेठही छेद जाता कामा नये ही अट पूर्ण करणे तसे  अशक्यप्रायच होते । श्री .बाबूराव यांनी साकडे घातले व प्राणांतिक उपोषणाला  आरंभ केला. नंतर दोन मूर्तिकार गिरवीला श्री . बाबूराव यांचा शोध घेत आले व जशी हवी तशी मूर्ती घडवून देण्याची तयारी दर्शवली. परंतु श्री बाबूराव अचंबित झाले कारण दोघांपैकी एकास हात नाहीत (थोटा ) तर दुसन्यास डोळे नाहीत (आंधळा ).  हे लक्षात येताच लगेचच अजिबात काळजी करू नका, हे कार्य आम्ही अपूर्ण ठेवणार नाही , परंतु एकाच्या दृष्टीने आणि दुसऱ्याच्या हाताने एकत्र काम करू . असे मूर्तिकार म्हणाले. तसेच श्री. बाबुराव याना त्यांचा अपेक्षित मूर्तीचे तपशीलवार वर्णन पण केले - "भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत  उभे आहेत. दोन गायी लक्षपुर्वक कान देऊन आणि तल्लीन   होऊन ऐकत आहेत असे हे रूप असून गोपाळकृष्णचे सर्व अलंकारही मूर्तीतच कोरलेले  असावेत.

हे अक्षक्यप्राय कार्य सुरु करतानाच शिल्पकारांनी स्पष्ट केले की,  या कार्यसाठी साधारण एक ते दिड महिना लागेल.  तसेच या कामासाठी स्वतंत्र जण पण आवश्यक आहे. तसेच त्यांना पूर्ण एकांत हवा  असून मूर्ती  घडवून पूर्ण झाल्यावरच   दर्शन घेता येईल .  या अवधीते ते स्वतः आपले अन्न शिजवून कार्य चालू ठेवतील. 

श्री . बाबुराव यांनी शिल्पकारांना स्वतंत्र जागा,  इंधन आणि स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू  पुरवलया.  ईष्वराने स्वमः च ही मूर्ती घडविल्याने एका रात्रीत ही दिव्य मूर्ती साकार झाली .  दुसर्‍या दिवशी पहाटेच श्री .बाबुराव यांना मूर्ती पाहण्यासाठी आमंत्रित  केले गेले  .

श्री .बाबुराव यांना मूर्ती कडे पाहून अतीव आनंद झाला,  क्षणभर आपण गो - लोकांत  आहोत  आणि  समोर श्रीकृष्ण पहात आहेत असे त्याना जाणवले .  आपल्या मानस पूजेमध्ये वर्षानुवर्षे ज्या स्वरूपाचे ध्यान केले तेच समोर साक्षात उभे आहे| श्री. बाबुराव यानी परब्रम्हास साष्टांग प्रणाम केला । श्री. बाबूराव यांना  आपले जीवन कृतार्थ झाल्येचे जाणवले.

 ही अलौकिक मूर्ती सुमारे ४ फूट उंच आहे व त्य्यामध्ये सुमारे ६\७ वर्षाच्या व गाईना घेऊन वनात जाणाऱ्या व बासुरी वाजवणच्या गोपालकृष्णचे रूप  साकारले आहे ।

मूर्तीचा व  दागिन्यांची शैली  वृंदावन / मथुरा पद्धतीची  असुन पीतांबरही मूर्तीतच कोरलेला आहे. श्रीमदभागवत, हरी- विजय व गर्ग - संहित  श्रेष्ट् ग्रंथातील वर्णनासारखीच  ही  मूर्ती आहे.  दोन्ही हात अशा प्रकारे दिसतात की ते बासरी वाजवत आहेत. तसेच तळवे स्पष्ट दिसत आहेत. दोन्ही गायींच्या चेहर्‍यावरील भाव  दर्शवतात कि त्या बासरी वादना  पूर्णपणे एकाग्रतेने ऐकत आहेत. तसेच पायाखालील एका  सुशोभित पट्टीवर चार लहान मानवी आकृत्या देखील दिसतात. त्यापैकी एक जय आणि विजय (श्रीविष्णूचे द्वारपाल) आणि दुसरे दोन शिल्पकार असल्याचे मानले जाते. अतिरिक्त वैशिष्ट्य हे की ,  मंदिर म्हणजे हरी (विष्णू) आणि  शिव (हर ) यांच्या एकात्मतेचे दुर्मिळ दर्शन आहे. इतर मंदिराप्रमाणे श्रीगरुड आणि  हनुमंत दिसतात (श्री गोपालकृष्ण शिवपिंडीच्या साकुकेवरच विराजमान आहेत. ) तसेच शिव व नंदी पण उपस्तित आहेत ।  भगवान राम किंवा श्रीकृष्णासमोर शंकर व नंदी उपस्तित असलेले , हे एकमेव ठिकाण आहे. समोरच्या मंदिरात भगवान शिव आणि नंदी व गरुड आणि हनुमंतही आहेतंच.  सर्वात मंहत्वाचे म्हणजे कृष्णाच्या मुखावर विलक्षण _प्रसन्नता आहे. त्यामुळेच पू . गोविंदकाका उपळेकर व जेष्ठ अध्यात्मिक व्यक्तींनी हे  मंदिर दक्षिण भारताचे  वृन्दावन आहे असे यथार्थ वर्णन केले आहे 

भगवान श्रीकृष्णाचे. प्रथम दर्शन घेतल्यावर बाबुराव यांनी शिल्पकारांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पोषाख  /  वस्त्रे  आणि मानधन देण्याचा मानस व्यक्ती केला. तथापी मूर्तिकारांनी प्रत्युत्तर दिले की, तुम्ही (श्री. बाबुराव ) भगवान गोपाळकृष्णांचे श्रेष्ठ भक्त आहात व तुमचा संतोष हीच आमची  बिदागी आहे . लगेचच मूर्तिकार जवळच्या एका विहिरीत आंघोळ करण्यासाठी. गेले व स्नान करून भोजनासाठी येतो असे सांगून गेले बराच अवधी गेला पण मूर्तिकार न आल्यानं श्री.बाबुराव अधीर आणि अस्वस्थ झाले . लगेचच कारागिरांना शोधण्यासाठी दूत पाठवले, पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले . तेव्हा श्री बाबुराव याना असा निष्कर्ष काढला की कारागीर सामान्य माणसे नसून साक्षात परमेश्वर होते व माझयावर कृपा करण्यासाठी येथे येऊन मूर्ती घडवून  स्वतः विठ्ठल आणि गोपाळ यांनी मूर्तिकार रूपात  हे मोठे काम केले व तत्काळ अदृश्य  झाले 

मंदिर आणि शिखर यांचे बांधकाम.

मंदिर  निर्मितीचे कार्य श्री. बाबुराव यांनी हाती घेतले व ते वेगाने पूर्णत्वास गेले. कारण भगवानाची पूर्ण कृपा प्राप्त होती. वैशाखातील पौर्णिमा हा  दिवस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी निश्चित केला गेला. वैशाखी पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. श्री. बाबुराव  यांना संकेत मिळाले  की त्त्यांचे मिळाले की त्यांचे कार्य या दिव्य मंदिर स्थ्यापने नंतर  पूर्ण झाला आहे.  नंतर ते पूर्ण अनुसंधानात राहील व श्रीहरी  कडून आज्ञा मिळताच संजीवनी समाधी घेतली. बांधकाम करताना मंदिरात तळघरची सोय आपल्या समाधी साठी श्री. बाबुराव  यांनी केली होती । हा दिवस होता बैसाखी कृष्णा प्रतिपदा जो नारद जयंतीचा पवित्र दिवस आहे . दुसरी समाधी गणपतीच्या समोरील मंदिरात स्थित आहे. तिसरी समाधी आहे ती  श्री.बाबूराव यांचे चिरंजीवांची तिसरी व चौथी समाधी आहे गरुड हनुमानाच्या मूर्तीशेजारी स्थित आहे  ती नातू  व पणतू  यांची आहे. सलग चार  पिढ्यांची समाधीची पार्श्वभूमी  असलेले हे एक दुर्मिळ स्थान आहे.  या दिव्या स्थानांच्या दर्शनासाठी योगीराज पू.शंकरमहाराज (धनकवडी ) आवर्जून  दर्शनासाठी येत असत.  पुण्यातील विख्यात वैज्ञानिक डॉ. आर. एन शुक्लाजी  यांनी आधुनिक उपकरणच्याद्वारे संक्षोधान केले. त्यांचे  निरीक्षण नोंदवले आहे.  फेब्रुवारी २०१२ मध्ये सविस्तर  सर्वेक्षण करण्यात आले की हे मंदिर एक  वैश्विक ऊर्जेचे  दुर्मिळ केंद्र असून सकारात्मक आणि आभा (ऑरा ) आणि कंपने स्पष्टपणे जाणवत  आहेत.  हे मंदिर दक्षिण भारतातील वृंदावन आहे व  या पवित्रतम स्थानी केलेली उपासना त्वरीत फलप्रद होते.  श्री. देशपांडे कुटुंबाने हा वारसा ६०० वर्षांहून अधिक काळ जपून ठेवला  आहे . . तसेच श्री जयंतराव देशपांडे यांनी अलिकडील काळात सातत्याने  वैदिक अनुष्ठान व होम-हवन करून ही ऊर्जा व साकारत्मना   वाढवण्याचा प्रयत्न केला आहे 

वार्षिक उत्सव

याच देशपांडे कुटुंबाने सुमारे ६५० वर्षांपासून नित्यपूजा व वार्षिक उत्सव इ. साजरे करून हा वारसा टिकवला आहे.  वैशाखी पौर्णिमा हा मोठा उत्सव साजर होतो.  जो नृसिहंजयंतीपासून ३ दिवस असतो व ऊत्साहत साजरा करण्यात येतो. यामध्ये  गोपालकृष्ण मूर्ती स्थापना दिवस ( वैशाखी पौर्णिमा ) साजरा केला जातो.  तेव्हा विशेष पूजा / अभिषेक, मंत्रपठण  इ. करण्यात येते.  नंतर ( वैशाखी कृष्णा प्रतिपदा ) मंदिरभोवती पालखी प्रदाक्षिणा,  ग्राम प्रदक्षिणा, कीर्तन ,  महाप्रसाद  इ. कार्यक्रम होतात.

वैशाख कृ. प्रतिपदेस श्री.बाबुराव यांचा संजीवन समाधिची विशेष पूजा करण्यात येते . सायंकाळी ४ वाजता कीर्तन सुरू होते. बालगोपाळांचे   विविध खेळ खेळले जातात. त्यात फुगड्या, टिप्र्या, रांधा - कृष्ण  सवांद, तसेच कृष्णा -पेंद्या संवाद गवळण इ. खेळ सादर केले जातात  दहीहंडी कार्यक्रम पण केला जातो. "काला प्रसाद" वितरित करतात. भजन-कीर्तन सेवाही केली जाते 

ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या सखोल वाचनाचा उत्सव (७ दिवस) श्रावण कृष्ण प्रतिपदा ते जन्माष्टमी या काळात उत्साहाने केले जाते. या पारायणात बरेच लोक भाग घेतात. जन्माष्टमी उत्सवानंतर पारंपारिक प्रसाद वाटप केला जातो. तसेच काकडआरती कार्तिकच्या संपूर्ण महिन्यात दररोज पहाटे केले जाते. बरेच अबालवृद्ध लोक या कार्यक्रमास  उपस्थित असतात. कार्तिक महिन्यात दिवाळीचा सण येत असल्याने, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई देवाला अर्पण केल्या जातात व नंतर हा प्रसाद भक्तमंडळींना दिला जातो. 

मंदिर आणि त्याचे व्यवस्थापन

शासनाच्या घोरणानुसार  मंदिराचा ट्रस्ट १९५७ मध्ये नोंदवला आहे.  आर्थिक व्यवहारांचे नियमितपणे ऑडिट केले जाते. पूर्वी  विश्वस्त मंडळामध्ये कै.राजाराम विनायक देशपांडे, श्री.रमेश कमलाकर देशपांडे,  कै.प्रमोद अमृत देशपांडे यांचा समावेश होता.  मंदिर ट्रस्टकडे उत्पन्याचे साधन नसल्याने, देखभाल करण्यासाठी परिवारातील लोकांनी प्रसंगी स्वतःच्या उत्पनातून यथाशक्ती खर्च केला . मुदतीच्या ठेवेतून . मुदतीच्या ठेवीवर मिळणान्या  अत्यल्प व्याजातून पूजेचा दैनिक खर्च,  वीज बील,  साफ सफाई या  व इतर अत्यावश्यक  खर्चाची पुर्तता करणे आव्हान असले तरी प्रत्येक पिढीने कार्य चालू ठेवले .सर्व दैनंदीन कार्ये आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने जबाबदारी घेतली. एकूण परिस्तिथीमध्ये भगवान गोपाळकुष्णच्या असीमकृपे मूळचे असे घडू शकले . गोपालकृष्णच्या कृपेने वंशपारंपागत वार्षिक उत्सव वर्षनुवर्षे , पिढीजात यथोचित पार पडत आले आहेत.

त्वरित जीणोद्वार करणे जरुरी झाले होते . त्या अनुषंगाने  श्री जयंत कृष्णाजी देशपांडे व सौ .श्रीमती सुनीता जयंत देशपांडे  यांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात तन , मन , धनाने जीणोद्वार केला व नवीन व्यवस्थापन अस्तित्वात आणले . त्यात श्री. जयंत व सौ सुनीता (विश्र्वस्त) आणि श्री. रघुनाथ देशपांडे ( सरचिटणीस) यांचा समवेत श्री. मुकुंद जोशी  (विश्र्वस्त)  आणि सहायक सचिव म्हणून श्री .निखिल देशपांडे यांनी कायापालट घडवून  आणला .उतसावंव्यतिरिक्त विविध धार्मिक कार्यकर्म नवीन व्यवस्थापनाने सुरु केले व त्यातून निरनिराळे यज्ञ , भागवत कथा , इत्यादी कार्यक्रम याथस्वी पणे पार पाडले . पुढली पिढीतील श्री .निखिल यांना परिश्रम घेऊन मंदिराची वेबसाईट २०११  नोव्हेंबर  मध्ये  सुरू केल्याने  नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब झाला व मंदिराची माहिती देशभर पसरली.

तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. देवधर यांनी जुलै २००६ मध्ये मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर सन २००९ मध्ये श्री.तिजारे (तत्कालीन धर्मदाय सहायक अयुक्त) यांनी मंदिरात  भेट दिली   सध्याच्या व्यवस्थापनाबद्दल आणि पुनरुज्जीवनाबद्दल समाधान व्यक्त केले.

बदल, नूतनीकरण आणि जागरुकता आणणे

मंदिराची अत्यल्प / नगण्य  उत्पन्न ही देखभाल व दुरुस्ती यामध्ये सर्वात मोठा  अडथळा होता । याशिवाय बाह्य भिंती आणि अंतर्गत भिंती ढासळळ्या होत्या . परिणामी मंदिरात राहणे आणि कोणतेही कार्य / अनुष्ठान करणे जवळजवब अशक्य  झाले  होते.  म्हणूनच  तात्कळ जीणोद्वाराही करणे अत्यावश्यक झाले होते . याबाबतचा विचार श्री.विनायक महादेव उर्फ ​​भाऊ यांचे नातू श्री. जयंत देशपांडे यांचा मनात वर्षानुवर्षे  रेंगाळत होता, कारण  बालपणापासूनच  त्यांचा ओढा अलौकिक व  भगवान गोपाळकृष्णाकडे झुकलेला होता. त्यामुळे  कै.श्री  विनायकराव यांचा ठाम विश्वास होता की योग्य वेळ आल्यावर  श्री जयंत देशपांडे हे जीणोद्वाराही  कार्य करतील.  तथापि हे एक मोठे बिकट काम फक्त श्रीकुष्णकृपानेच पार  पडणारे होते.  त्यामुळे श्री. जयंत यांनी कित्येक वर्षे  अनेक अनुष्ठाने केला आणि अनेक  संतांचे आशीर्वाद घेतले. इंदूरचे महान सत्पुरुष व दत्तवातारी श्री.नाना महाराज तराणेकर आणि ब्रह्मश्री श्री दत्त महाराज कवीक्ष्वर यांचे आशीर्वाद  प्राप्त केले,  त्यानुसार मंदिराची दुरुस्ती व पुनर्विकास करण्यात आले. पाणी, वीज, स्वयंपाकघर, स्नान गृह इत्यादी अत्यावश्यक सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या.  .तसेच यापूर्वी कोसळलेले शिखर तज्ञांच्या मतानुसार पुन्हा बांधण्यात आले।

२००६ च्या मध्यामध्ये मंदिराचे नवीन मुख्य प्रवेशद्वार स्थापित केले गेले. ३० जुलै २००६ रोजी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चारांनी शिखरावर नूतन कळसाची विधीवत स्थापना केली गेली. तत्पूर्वी गावात कलशांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर ५१ सुवासिनीनी कळसाचे औक्षण/पूजन केले आंध्र प्रदेशातील एक  घोर   आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व श्री. दिनकरस्वामी. यांचे शुभह्स्ते कलश स्थापना झाली व या ऐतिहासिक कार्यक्रमाची सांगता गोपाळकृष्ण गिरवी मंदिरावरील पुस्तकाच्या प्रकाशनानंतर झाली आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप केले गेले.  महाराष्ट्रातील दुर्गम भाग व देशाच्या विविध भागातून काही भाविक जमले होते. कलश स्थापनेच्या वेळी  भगवान गरूड (भगवान विष्णू यांचे वाहन) यांचे आकाशान दर्शन झाले असा अनुभव  त्यांनी व्यक्त केला । त्यानंतर २००८ मध्ये  गरूड-हनुमंत, शंकर-नंदी आणि गणेश यांचे मंदिरांचा  जीणोद्वाराही  करण्यात आला. 

अलीकडेच धार्मिक अनुष्ठाने  वाढवण्याचा प्रयत्न खालील पद्धतीने केला जात आहे

१. वर्षभर सर्व एकादशीचा पवमान व रुद्र अभिषेक 

२. गीता आणि विष्णुसहस्त्रनाम पठण  सेवा वर्षातून ३/४ वेळा 

३. भागवत सप्ताह 

४. पवमान आणि महारुद्र अनुष्ठान (पवमान १४४ पाठ व रुद्र १३३१ आवर्त ने   )

मंदिरात संहिता व स्वाहाकार सुद्धा आठ प्रसंगी "श्रीमद्भागवत सप्ताह "  आयोजित करण्यात आला

१. हरिओमस्वामी यांनी २००५

२. डॉ रा . ल. जोशी यांनी २००६

३. आनंदशास्त्री पारखी यांनी २००७

४. नारायणशास्त्री गोडबोले यांनी २००८

५. आनंदशास्त्री पारखी यांनी २००९

६. विष्णूशास्त्री असोलेकर यांनी २०१०

७. मुकुंद काका जातदेवळेकर यांनी २०११

८. पद्माकर कुंडीकर शास्त्री यांनी. २०१३

वरील सर्व भागवत कथा तसेच अनुष्ठाने व विविध यज्ञांनी सकारात्मक उर्जा निर्माण झाली आणि परिणामी या भागात पावसाच्या प्रमाणात दुष्काळी भागात काहीशी वाढ झाली | 

श्रीमद् भागवत सप्तहाच्या  आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि श्रोत्यांना मोठे समाधान मिळाले  असे त्यांनी व्यक्त केले.  गावकरी, विशेषत: जुन्या पिढीतील लोक नमूद करतात की ७५ वर्षांपासून या मंदिरात एवड्या मोठ्या प्रमाणात असे कोणतेही कार्यक्रम / अनुष्ठाने करण्यात आली नाहीत (आमच्या आठवनणीत  आम्हाला असे कार्यक्रम आत्ता  प्रथमच बघायला मिळाले) दरम्यान श्री.बाबुराव महाराज यांच्या आरतीची लयबद्ध रचना ईश्वरी संकेत व प्रेरणानुसार केला गेली.  ती रोज म्हणण्यात येते. भाविकांच्या मागणीनुसार नित्य उपासना (अभिषेका आणि नंदादीप ) या योजना सुरू केल्या आहेत.   श्री. जयंत देशपांडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण जीणोद्वाराही तसेच अनुष्ठाने इ. कार्य केले . मंदिरात निधी नसल्याने तसेच कोणाकडूनही देणगी मिळाली नाही. परंतु  नूतनीकरणाचे काम पुढे प्रतीक्षा करू शकत नसल्याने हे काम स्वखर्चाने पूर्ण केले. तसेच या कार्यात चि . निखिल आणि सौ चारुता या तरुण पिढीचे प्रतिनिधी यांनीही  आर्थिक  वाटा उचलला तसेच श्रमातही योगदान दिले व म्हणून विशेष कौतुक वाटण्यास पात्र आहेत .

 कार्ये आणि योजना 

तसेच त्यांची मातोश्री  स्व.श्री. राधाबाई देशपांडे (ज्येष्ठ नागरिक) आपल्या निवृत्तीवेतनातून काही रक्कम दिली. जीर्णोद्वाराच्या अंतिम टप्प्यात श्री जयप्रकाश कापरे आणि त्यांच्या पत्नीनेही काही आर्थिक योगदान दिले.

दुसरे महत्त्वपूर्ण टप्यात श्री. जयंत व सौ. सुनिता यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि ते म्हणजे विहिरीजवळील मूर्तिकारांच्या पादुका चे बांधकाम होते ( जेथून देवरूपी मूर्तिकार अदुश्य  झाले होते ) ते प्रत्यक्षात आले.  तशी प्रेरणा व संकेत श्री जयंत यांनी प्राप्त झाले होते व २७ मे २०१० रोजी अनेक ज्येष्ठ संत व भक्त उपस्थित होते. श्री उदयसिंह कदम आणि त्यांच्या परिवाराच्या सहकार्याने ते साध्य झाले.

सन २०१०, २०११, २०१२ मध्ये वेद-स्वाहाकार यांचे आयोजन सातारा येथील श्री. विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले. तसेच, २०१० पासून गीता आणि विष्णूसहस्त्रनाम पठण दरवर्षी विविध प्रसंगी केले जात आहे. पुणे, कोल्हापूर, मुंबई, फलटण येथील विविध गट पठणाची सेवा करण्यासाठी मंदिरात  येत आहेत . 

या स्थानातील नेत्रदीपक कार्याची दखल दूरवरच्या अध्यात्मिक संस्थांनी घेतली.  स्वामी स्वरूपानंदजी यांच्या हस्ते नाशिक येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यामध्ये मंदिराला "आदर्श अध्यात्मिक संस्था "   म्हणून सन्मानित करण्यात आले.

देशभरातील व देशाबाहेरील भक्तांना मंदिराविषयी माहिती देण्यासाठी  प पू अच्युतानंद सरस्वती यांच्या हस्ते www.gopalkrishnagirvi.org नावाची वेबसाइट २४ नोव्हेंबर २०११ रोजी सुरू करण्यात आली.

श्रीमदभागवत गीता आणि श्रीमदभागवत या विषयातील  ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व श्री. दिलीप आपटे यांनी त्यांच्या शिष्यांसह साधना व उपासनेसाठी या मंदिराला भेट दिली आणि जुलै २०१२  मध्ये त्यांनी गायत्री यज्ञ आयोजित केला. 

मंदिराचे महत्त्व आणि त्याचा अनन्य इतिहास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पसरत आहे, यामुळे महाराष्ट्रातील  विविध भागातून तसेच गुजरात , कर्नाटक आंध्र, मध्य प्रदेश सारख्या दुसऱ्या राज्यातील भक्त मोठ्या संख्येने भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येत आहेत.

प. पू.  श्री. वीरजानंद नृसिंह सरस्वती  ( म्हैसूर ) हे . दक्षिण भारतातील येथील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व या  स्वामींनी ऑक्टोबर २०१० मध्ये त्याच्या शिष्यांसह मंदिरात भेट दिली आणि त्यांनी "कॉल ऑफ  गिरवी गोपाळ" या नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

जगतगुरू श्री. शंकराचार्य (करवीर पिठ ) यांनी एप्रिल २००९ मंदिरात येऊन वास्तव्य केले  मंदिर आणि मंदिराच्या प्रसन्न व जागृत वातावरणामुळे ते खूप प्रभावित झाले . चातुर्मास (अर्थात आषाढीच्या पूर्णिमा पासूनच दोन महिन्याचा कालावधी) वास्तव्य करून त्यांचा मंदिरात साधना, पूजा व सत्संग करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे . 

हिमालयातील स्वामी योगिनी अमृतामयी यांनीही मंदिराला भेट दिली आणि भक्तांना मार्गदर्शनासह आशीर्वाद दिला. 

श्री जयंत देशपांडे यांच्या आध्यत्मिक  क्षेत्रातील दूरदूरच्या आणि व्यापक संपर्कांमुळे देशातील विविध भागातील तपस्वी व ज्येष्ठ साधक मंदिरात भेट देतात . 

स्वामी गोविंद देव गिरीजी (किशोरजी व्यास) हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ आध्यात्मिक  व्यक्तिमत्त्व स्वामीजी मार्च २०१६ मध्ये दर्शनासाठी आले होते आणि असे व्यक्त  केले की पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे असे अनोखे प्रसन्न आणि दिव्यदर्शन झाले.  

साधकांना आवाहन आहे की,  ते स्वतः च्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मंदिराच्या विविध प्रकल्प आणि योजनांमध्ये सहभागी होऊ शकतात. राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्टी डोळ्यांसमोर ठेवून संकल्प हे राष्ट्रीय कल्याण, वैदिक संस्कृती  आणि गीता संदेश यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध यज्ञ आणि अनुष्ठाने केली जातात.

 "मुर्तीशास्त्र" (शिल्प) च्या क्षेत्रातील एक ख्यातनाम अभ्यासक डॉ. गो .बं देगलुलकर यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये मंदिरात दर्शन घेतले अतिशय प्रभावित झालो असे  मत व्यक्त  करून ही एक अतिशय अनोखी मूर्ती आहे असाही अभिप्राय दिला . 

डॉ. रा . ना शुकलाजी (प्रख्यात अध्यात्मिक वैज्ञानिक ) यांनी २०१३ साली भेट दिली आणि असे सांगितले की, हे मंदिर जागतिक ऊर्जेचे केंद्र आहे .  तसेच मंदिरातील उर्जा कंपने (Aura & Vibration) खूप शक्तिशाली आहेत. त्यानंतर डॉ. शुक्ला यांनी तीनदा भेट दिली आणि साधकांना आवाहन केले की हे मंदिर "दक्षिण भारताचे वृंदावन" आहे आणि साधकांनी स्वतः च्या आध्यामिक प्रगतीसाठी  गिरवी गोपाळकृष्णाचे दर्शन जरूर घ्यावे व तेथे उपासना करावी 

या मंदिराचे महत्त्व आणि वेगळेपण लक्षात घेऊन दिव्या सोम ट्रस्टने ऑगस्ट २०१७ मध्ये जगातील पहिले सोमा  अभिषेक हे एक मोठे अनुष्ठान गिरवी मंदिरात संपन्न केले ज्यात अनेक नामवंत वैदिक पंडित व आयुर्वेद तज्ज्ञ उपस्थित होते.